८० वर्षें व त्या वरील निर्वत्तीवेतनधारक/कुटुंब निर्वत्तीवेतनधारक निर्वत्तीवेतन/कुटुंब निर्वत्तीवेतन वाढ करणेबाबत
८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृतिनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तिवेतन कुटुंब निवृत्तिवेतनात वाढ दि.०१.०१.२०१९ पासून सुधारित करण्यात आला आहे. शासन आता असा आदेश देत आहे की, सदर दर दि.०१.०१.२०२४ पासून पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहे.
सदर लाभ केवळ दि. ०१/०१/२०२४ पासून देय राहील तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.
या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणार्या निर्वत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तिवेतन संवितरण अधिकारी यांची राहील, प्राधिकारी म्हणजेच , अधिदान व लेखा अधिकारी,
मुंबई कोषागार यांची राहील.
माहिती लाईक शेअर कमेंट करा.धन्यवाद
