Wednesday, 17 January 2024

राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबविणेबाबत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' हा उपक्रम राबविणेबाबत

          राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' हा उपक्रमांतर्गत 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवणूक' विषय/थिम राबविणेबाबत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई दि. १६ जानेवारी २०२४ राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' हा उपक्रमांतर्गत विषय /थिम राबविणेबाबत.

            महावाचन उत्सव याकरिता 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवणूक' एक विषय/ थिम देण्यात येत आहे. या अनुषंगाने, महावाचन उत्सवाचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या आठवडयात आपल्या अधीनस्त सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक' ही थिम राबविण्यात यावी. थिम राबविण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करता येईल.

विदयार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करावा. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विदयार्थ्यांकडून उपरोक्तनुसार एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करावे, संदर्भिय पत्र क्र. २ मधील मार्गदर्शक सुचनानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी.

राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबविणेबाबत.

             👉 Download 👈

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा schoolandapps.blogspot.com 
हा ब्लॉग.

 माहिती लाईक शेअर कमेंट करा.धन्यवाद



शालेय पोषण आहार मधील पुरक आहारा मध्ये बेदाण्याचे समावेश करणेबाबत

 शालेय पोषण आहार मधील पुरक आहारा मध्ये बेदाण्याचे समावेश करणेबाबत           शालेय पोषण आहार योजना आताची पंतप्रधान पोषण शक्ती योजना अंतर्गत त...