सातवा वेतन आयोग चौथा हप्ता अपडेट्स
सातवा वेतन आयोग चौथा हप्ता जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 मध्ये मिळणार संचालक यांचे आदेश.
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचे दि.29/01/2024 रोजी चे आदेश.
जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने.
लेखाशिर्ष २२०२०१७३/०४ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद सातव्या वेतन आयोगाचा ४ था, व अशंराशीकरण, उपदानासाठी अदा करावयाची आहे. उपरोक्त बाबीशिवाय इतर बाबींवर खर्च करण्यात येवू नये.
उपरोक्त निधी खालील अटींच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.
अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार
प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावे
इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४नियम ३९ (ब) टिप-४ अनुक्रंमाक ५नियम ३९ (ब) टिप-५तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे.
वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये.
वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २०२३
सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने ४ था हप्ता, व अशंराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात यावी. उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे. उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसांत संचालनायास सादर करावा.