शालेय पोषण आहार मधील पुरक आहारा मध्ये बेदाण्याचे समावेश करणेबाबत
शालेय पोषण आहार योजना आताची पंतप्रधान पोषण शक्ती योजना अंतर्गत तांदुळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरूपात नियमित दिलं जातो. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील १ली ते ८वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.
पोषण आहार सोबत दर आठवड्याला किमान एक दिवस पुरक आहार दिला जातो. फळे, सोया बिस्किटे, दूध, चिक्की, गुळ, राजगिरालाडू,शेंगदाणे,बेदाणे, इचुरमुरे, इ. स्वरूपात पूरक आहार देण्याचे शासन निर्णय दि.2 फेब्रुवारी 2011 अन्वय दीले आहेत.
राज्यामध्ये सद्यस्थिती मध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून आठवळ्यातून एक दिवस अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत आहे. राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवडयातुन एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाण्याचा लाभ आहेत, त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत योजनेंतर्गत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मध्ये नमूद केल्यानुसार नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून सोयाविस्कीट, दूध, चिक्की,राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे,बेदाणे,चुरमुरे इ.स्वरुपात लाभ देण्याबाबत आपल्या स्तरावरून पुनःश्च सर्व शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना लेखी निर्देश देण्यात याव्यात.असे आदेश आज दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.